ही
रोजनिशी आहे शेतीप्रश्नाशी
जोडलेल्या काही जणांच्या, काम
करताना येणाऱ्या, अनुभवांची.
ही "जणं" कोण? हे
आत्ता येथे मांडण्याची गरज
नाही. ते
प्रत्येकाच्या अनुभवाच्या
मांडणीतून पुढे येत जाईलच. परंतु
इतके मात्र आत्ता सांगता येईल
की शाश्वत, समन्यायी
व शोषणमुक्त लोकशाहीवादी
समाजाकडे वाटचाल करताना
शेतीपद्धतीचीसुद्धा त्या
दिशेने वाटचाल झाली पाहिजे
या विचाराने काम करणाऱ्या सर्वांची
ही रोजनिशी आहे.