Thursday, January 8, 2015

बिगर बीटी कापसाचा अनुभव – नोंद घेण्याजोगा


 
 










विदर्भ व यवतमाळ जिल्ह्याचे काही शेतकरी 15.12.2014 रोजी एक दिवसीय आभ्यास दौऱ्याला गेले होतेत्या दिवशी आम्ही बीटी व बिगर बीटी अशा दोन्ही कपाशी लावलेल्या किशोर थोटे यांच्या शेतावर गेलोकिशोर भाऊंच्या मते बिगर बीटीला कीटकनाशकांच्या फवार्‍यांची गरज पडली नाही, कारण त्या कापसाला उशीरा बोंडं आली आणि जेव्हा बोंडं आली तेव्हा बोंड आळीचा हंगाम निघून गेलेला.
बिगर बीटीची वाढसुद्धा जास्त जोमाची व रोपे जास्त ठणठणीत आहेत (छायाचित्रात पाहिले तर लक्षात येईल की झाडांची वाढ अगदी 4-5 फुट उंच इतकी होऊ शकते).
15.12.2014 पर्यंतची परिस्थिती:


बीटी कापूस
बिगर बीटी कापूस
बियाण्याचा स्रोत स्थानिक कृषी सेवा केंद्र नागपूर बीजोत्सव 2014
खतांचे प्रमाण वेळा वेळा
फवारे कीटकनाशकांचे फवारे 1मूलद्रव्यांचा (nutrient) फवारा
त्या जमिनीतील आधीचे पीक शेणखत दिलेली हळद सोयाबीन

आता वरील अनुभव व आकडेवारीवरून हे नक्कीच वैज्ञानिकदृष्ट्या शास्त्रशुद्धपणे नाही म्हणता येत की बिगर बीटी हे बीटीपेक्षा जास्त चांगलेपरंतु यावरून हे मात्र नक्कीच म्हणता यॆईल की बिगर बीटीला आपण सर्व व विशेषतः सरकारी यंत्रणा सावत्र मुलीची वागणूक देत आहोत.
थोडक्यात म्हणजेआज किशोर थोटेंसारख्या इतर शेतकर्‍यांच्या अनुभवांची नोंद घेवून त्यांचा शास्त्रोक्त पद्धतीने आभ्यास करणे गरजेचे आहे.
शेतकर्‍याचे नावकिशोर मारुतीराव थोटे
मुपोकारेगावताजियवतमाळ
मोबाईल: +91-9423432580

इमेलkthote07@gmail.com