Monday, February 1, 2016

ब्राझीलमधील लोकलढा, आजच्या जागतिक प्रश्नांचा चेहरा आणि दुसरा आंतरराष्ट्रीय 'राजकीय संघटकांसाठी राजकीय प्रशिक्षण' वर्ग आॅक्टोबर २०१५

गणेश बिराजदार, धरामित्र वर्धा

[सुचना : प्रस्तुत लेख हा विस्तृत शोधनिबंध नसून पावरपाॅंइट प्रेसेंटेशनच्या साह्याने केलेल्या मांडणीचा सारांशलेख आहे . येथे दिलेली माहिती आणि आकडेवारी प्रत्यक्ष वस्तुस्थितीपेक्षा वेगळी असू शकते, त्यामुळे आवश्यक तेव्हा ती इतर स्त्रोतांमधून पडताळून घ्यावी (जरी बहुतेक आकडेवारी ही विविध शोधनिबंधांमधून पडताळणी केलेली आहे, आणि संबंधीत शोधनिबंधांचा संदर्भ जोडलेला आहे). येथे संदर्भ जोडलेले शोधनिबंध इतकेच दर्शवितात की, संबंधीत मुद्यांवर अधिक माहितीसाठी वाचकाच्या माहितीस्तव ते जोडले आहेत, मात्र त्यांचा विस्तृत अभ्यास या लेखासाठी केला गेलेला नाही. लेखातील बहुतांशी माहिती ही पोर्तुगीज भाषिक ब्राझीलमधील घडामोडींसंदर्भात असल्यामुळे बरेच संदर्भलेख हे पोर्तुगीज भाषेत आहेत, मात्र पोर्तुगीज लेखांचे चांगले इंग्रजी भाषांतर गुगलच्या साहाय्याने होऊ शकते.]

चाैकट १

दिनांक २६ आॅक्टोबर ते १२ डिसेंबर या दरम्यान ग्वारारेमा, ब्राझील येथे, 'राजकीय संघटकांसाठी राजकीय प्रशिक्षण' हा सात आठवड्याचा वर्ग पार पडला. या वर्गाचा उद्देश, त्याची पार्श्वभूमी आणि त्यातून एक प्रशिक्षणार्थी म्हणून माझे झालेले शिक्षण याची मांडणी या लेखात केलेली आहे.