सायतखर्ड्याचे
शंभू कर्णू मोहुर्ले.
2001-02 साली
धरामित्र च्या सेंद्रिय शेती
प्रकल्पाच्या निमित्ताने
सेंद्रिय शेतीला सुरुवात
केली. आणि
खूपच कमी अवधीत ती इतक्या
उत्तम पद्धतीने केली की, केवळ
गावोगावचे शेतकरीच नव्हे, तर
देश-विदेशातील
शेती अभ्यासकांनी त्यांच्या
शेतीला भेट दिली.
2010 साली
त्यांनी पुन्हा रासायनिक
खतांचा वापर सुरु केला. कारण? त्यांच्या
शब्दात,
“जमीन
आठ-नऊ
वर्षे चांगली सांभाळली
होती, त्यामुळे
थोडंसं खतपाणी करुन भरपुर
उत्पन्न काढले, तर
लग्नकार्य वगैरे मोठी कामे
काढता येतील असा विचार केला. बॅंक
बॅलन्स जमवला होता, तो
एकदाचा काढून घेतला.” त्यामुळे
रासायनिक खतांचा वापर केल्यानंतर
पहिल्या वर्षी कापसाचे उत्पन्न
निघाले एकरी 20 क्विंटल. आता
कमी होत-होत
चाैथ्या वर्षी ते एकरी 16 क्विंटल
वर आले आहे. शिरोलीचा
तरुण शेतकरी विषाल सांगतो, तो
एका क्षेत्रात तीन वर्षे
कमीत-कमी
रसायने वापरुन सोयाबीनचे पिक
घेतो आणि चाैथ्या वर्षी जास्त
उत्पन्नासाठी म्हणून कापसाचे
पिक घेतो. पंगडीचे
प्रयोगशील शेतकरी भीमराव
चिंचोलकरांना विचारलं, भाऊ
तुम्ही धरामित्र चा प्रकल्प
थांबल्यानंतर अजुन सेंद्रिय
शेती करताय का? भाऊंचं
उत्तर,
“सायब, सांगाले
म्हणजे.. सेंद्रिय
मध्ये मोडत नाय, रासायनिक
मध्ये नाय मोडत, अन्
कायच्यात मोडत नाय, तर
मग तुमाले मग मी सांगाचं कसं
नेमकं? अन्
बनवा-बनवी
करायचा आपल्यायले उपाव नाय?” पण
त्याबद्दल काही हरकत नाही, फक्त
आम्हाला तुम्ही कशा पद्धतीने
करता हे समजुन घ्यायचं आहे, असं
सांगितल्यावर भीमराव भाऊ
म्हणाले,
“आता
म्या कणाय गेल्या वर्षी... म्या
खत देल्लं बा, तुरीले
फक्त नाय देल्लं, पर
ह्या कणाय पराटीला देल्लं. आण
माहा फलाट कसा ऱ्हायते
सायब, बिलकुल
फारच कमी हिशोब ऱ्हायते. तरी
ह्या सालायले की नाय सायब, लोकायच्या
मानानं मी हिशोबात हाव.” ते
सांगतात, या
घडीला गावात अशा विचाराने
शेत करणारे शेतकरी चार आणे
असतील. शिरोळीचे
शेतकरी सांगतात, गावात
पूर्ण सेंद्रिय पद्धतीने
करणारे शेतकरी फार नाहीत, पण
एकुण रासायनिक शेतीतील
अनुभवांमुळे शेतकऱ्यांचा
ओढा आपोआप कमी होत आहे. शंभू
मोहुर्ले सांगतात, त्यांचं
पाहुन गावातील काही शेतकऱ्यांनी
खतांचा वापर कमी केला होता, मात्र
त्यांनी स्वतःच रासायनिक खते
वापरायला सुरुवात केल्यामुळे
लोक ती कल्पना विसरुन गेले. गावात
जास्तीत जास्त खत टाकायची
आणि जास्तीत जास्त उत्पन्न
काढायची, अक्षरशः
स्पर्धा आहे.
ही
मोजकी उदाहरणं काय सांगतात? पहिली
गोष्ट, या
वर्षी काळ्या आईनं मला
अपेक्षेपेक्षा जास्त दिलं
म्हणुन मीही तिला जास्तीच्या
पैशात बाहेरुन विकत घेऊन शेनखत
टाकलं, असं
सांगणारे सुभाष शर्मा आणि
शंभू मोहुर्लेमध्ये काय फरक
असेल, तर
काहीतरी दिल्याशिवाय काही
मिळणार नाही, हा
व्यवहार सुभाषजी कसोशीनं
पाळतात. गंमत
म्हणजे, शंभूभाऊना
याची जानीव नाही असं नाही. पण
इतकंच की, भरपुर
उत्पन्न, मोठं
लग्न म्हणजेच प्रतिष्ठा, प्रतिष्ठा
म्हणजे सुख या साऱ्या गोंधळात
तो व्यवहार सांभाळणं कुठे
तरी राहुन जातं.
दुसरी
गोष्ट, ही
सगळी शेती करण्याच्या बाबतीतली
व्यवहारिक धोरणाची उदाहरणं
आहेत, अडचण
इतकीच की, ती
पुरेशी व्यवहारिक
नाहीत. अर्थात, शेतकऱ्यांना
मागच्या 50 वर्षातल्या
अनुभवातुन ही जानीव झालेली
आहे, की
निव्वळ ओरबाडत राहुन शेती
करता येणार नाही, पण
त्याच वेळेला, माझ्या
गरजा भागण्यापुरतं तरी मला
शेतातुन मिळत राहिलंच
पाहिजे. त्यामुळे
सेंद्रिय शेती म्हणजे, खतं
आणि रसायनं सोडुन करायची फकिरी
इतकेच जोपर्यंत सेंद्रिय
शेतीबद्दलचे सामान्य शेतकऱ्यांचे
आकलण राहील तोपर्यंत शंभूभाऊ
सारख्या कितीतरी शेतकऱ्यांचं
तळ्यात-मळ्यात
सुरुच राहील. आणि
त्यातील अधिक हानीकारक गोष्ट
म्हणजे, त्याचा
वर त्यांनीच वर्णन केल्याप्रमाणे
इतर शेतकऱ्यांवर होणारा
परिणाम. म्हणुन
सेंद्रिय शेतीचा प्रसार करणारी
यंत्रणा म्हणुन आपल्यालाच
मुळात हा व्यवहारिकपणा अधिक
चांगल्या पद्धतीने परिभाषित
करुन तो शेतकऱ्यांपर्यंत
पोहचविण्याची गरज आहे. हा
विचार अगदी नियोजनपूर्वक
बिंबविण्याची गरज आहे,
"प्रश्न
हा नाही की, शेतात
कृत्रीम रसायनं टाकायची की
नाही? प्रश्न
हा आहे की, अजुन 40 वर्षे
पिक घेत राहायचं की,
4 वर्षात
शेतीचं वाळवंट करायचं? ते
कसं करायचं, हे
मात्र तुम्ही ठरवू शकता.”
जी.एस. विश्वनाथ,
धरामित्र, वर्धा
gsbirajdar516@gmail.com