Friday, December 19, 2014

तळ्यात? की मळ्यात?

सायतखर्ड्याचे शंभू कर्णू मोहुर्ले. 2001-02 साली धरामित्र च्या सेंद्रिय शेती प्रकल्पाच्या निमित्ताने सेंद्रिय शेतीला सुरुवात केलीआणि खूपच कमी अवधीत ती इतक्या उत्तम पद्धतीने केली कीकेवळ गावोगावचे शेतकरीच नव्हेतर देश-विदेशातील शेती अभ्यासकांनी त्यांच्या शेतीला भेट दिली. 2010 साली त्यांनी पुन्हा रासायनिक खतांचा वापर सुरु केलाकारणत्यांच्या शब्दात, “जमीन आठ-नऊ वर्षे चांगली सांभाळली होतीत्यामुळे थोडंसं खतपाणी करुन भरपुर उत्पन्न काढलेतर लग्नकार्य वगैरे मोठी कामे काढता येतील असा विचार केलाबॅंक बॅलन्स जमवला होतातो एकदाचा काढून घेतला.” त्यामुळे रासायनिक खतांचा वापर केल्यानंतर पहिल्या वर्षी कापसाचे उत्पन्न निघाले एकरी 20 क्विंटलआता कमी होत-होत चाैथ्या वर्षी ते एकरी 16 क्विंटल वर आले आहेशिरोलीचा तरुण शेतकरी विषाल सांगतोतो एका क्षेत्रात तीन वर्षे कमीत-कमी रसायने वापरुन सोयाबीनचे पिक घेतो आणि चाैथ्या वर्षी जास्त उत्पन्नासाठी म्हणून कापसाचे पिक घेतोपंगडीचे प्रयोगशील शेतकरी भीमराव चिंचोलकरांना विचारलंभाऊ तुम्ही धरामित्र चा प्रकल्प थांबल्यानंतर अजुन सेंद्रिय शेती करताय काभाऊंचं उत्तर, “सायबसांगाले म्हणजे.. सेंद्रिय मध्ये मोडत नायरासायनिक मध्ये नाय मोडतअन् कायच्यात मोडत नायतर मग तुमाले मग मी सांगाचं कसं नेमकंअन् बनवा-बनवी करायचा आपल्यायले उपाव नाय?” पण त्याबद्दल काही हरकत नाहीफक्त आम्हाला तुम्ही कशा पद्धतीने करता हे समजुन घ्यायचं आहेअसं सांगितल्यावर भीमराव भाऊ म्हणाले, “आता म्या कणाय गेल्या वर्षी... म्या खत देल्लं बातुरीले फक्त नाय देल्लंपर ह्या कणाय पराटीला देल्लंआण माहा फलाट कसा ऱ्हायते सायबबिलकुल फारच कमी हिशोब ऱ्हायतेतरी ह्या सालायले की नाय सायबलोकायच्या मानानं मी हिशोबात हाव.” ते सांगतातया घडीला गावात अशा विचाराने शेत करणारे शेतकरी चार आणे असतीलशिरोळीचे शेतकरी सांगतातगावात पूर्ण सेंद्रिय पद्धतीने करणारे शेतकरी फार नाहीतपण एकुण रासायनिक शेतीतील अनुभवांमुळे शेतकऱ्यांचा ओढा आपोआप कमी होत आहेशंभू मोहुर्ले सांगतातत्यांचं पाहुन गावातील काही शेतकऱ्यांनी खतांचा वापर कमी केला होतामात्र त्यांनी स्वतःच रासायनिक खते वापरायला सुरुवात केल्यामुळे लोक ती कल्पना विसरुन गेलेगावात जास्तीत जास्त खत टाकायची आणि जास्तीत जास्त उत्पन्न काढायचीअक्षरशः स्पर्धा आहे.
ही मोजकी उदाहरणं काय सांगतातपहिली गोष्टया वर्षी काळ्या आईनं मला अपेक्षेपेक्षा जास्त दिलं म्हणुन मीही तिला जास्तीच्या पैशात बाहेरुन विकत घेऊन शेनखत टाकलंअसं सांगणारे सुभाष शर्मा आणि शंभू मोहुर्लेमध्ये काय फरक असेलतर काहीतरी दिल्याशिवाय काही मिळणार नाहीहा व्यवहार सुभाषजी कसोशीनं पाळतातगंमत म्हणजेशंभूभाऊना याची जानीव नाही असं नाहीपण इतकंच कीभरपुर उत्पन्नमोठं लग्न म्हणजेच प्रतिष्ठाप्रतिष्ठा म्हणजे सुख या साऱ्या गोंधळात तो व्यवहार सांभाळणं कुठे तरी राहुन जातं.
दुसरी गोष्टही सगळी शेती करण्याच्या बाबतीतली व्यवहारिक धोरणाची उदाहरणं आहेतअडचण इतकीच कीती पुरेशी व्यवहारिक नाहीतअर्थातशेतकऱ्यांना मागच्या 50 वर्षातल्या अनुभवातुन ही जानीव झालेली आहेकी निव्वळ ओरबाडत राहुन शेती करता येणार नाहीपण त्याच वेळेलामाझ्या गरजा भागण्यापुरतं तरी मला शेतातुन मिळत राहिलंच पाहिजेत्यामुळे सेंद्रिय शेती म्हणजेखतं आणि रसायनं सोडुन करायची फकिरी इतकेच जोपर्यंत सेंद्रिय शेतीबद्दलचे सामान्य शेतकऱ्यांचे आकलण राहील तोपर्यंत शंभूभाऊ सारख्या कितीतरी शेतकऱ्यांचं तळ्यात-मळ्यात सुरुच राहीलआणि त्यातील अधिक हानीकारक गोष्ट म्हणजेत्याचा वर त्यांनीच वर्णन केल्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांवर होणारा परिणामम्हणुन सेंद्रिय शेतीचा प्रसार करणारी यंत्रणा म्हणुन आपल्यालाच मुळात हा व्यवहारिकपणा अधिक चांगल्या पद्धतीने परिभाषित करुन तो शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याची गरज आहेहा विचार अगदी नियोजनपूर्वक बिंबविण्याची गरज आहे, "प्रश्न हा नाही कीशेतात कृत्रीम रसायनं टाकायची की नाहीप्रश्न हा आहे कीअजुन 40 वर्षे पिक घेत राहायचं की, 4 वर्षात शेतीचं वाळवंट करायचंते कसं करायचंहे मात्र तुम्ही ठरवू शकता.”
जी.एसविश्वनाथ,
धरामित्रवर्धा
gsbirajdar516@gmail.com




No comments:

Post a Comment