Sunday, April 19, 2015

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे

Click here for English version
हे सारे प्रश्न तर आहेतच सर, आणि आपल्याला हेही दिसतंय की बाहेरचं कोणी येवून आपल्यासाठी काही करणार नाही. मग आपल्यालाच काही उपाय काढावा लागणार ना?”
उपाय काय, आपल्या मुलांना शिकवायचं आणि इथून बाहेर काढायचं.”
पण शेवटी कोणालातरी शेती करावीच लागेल ना सर, अन्न काही कारखाण्यात तयार करता येत नाही.”
हो तर मग तिकडच्या लोकांना येवून करू द्या ना शेती. यांनीच नेहमी शेती करावी असं आहे का? इथली पोरं बाहेर जातील, आणि तिथला भार वाढेल, तर त्यांना इकडं येवून शेती करावीशी वाटेल. तिकडचा भार कधी वाढला नाही म्हणून कोणाला शेतीची चिंता नाही.” गजानन सोरटे, पाचोडच्या शाळेचे मुख्याध्यापक बोलत राहिले, “मला सांगा, सगळ्या गोष्टींची भाववाढ होते, पण पंधरा वर्षात सोयाबीनचा भाव वाढला नाही. मग तुम्ही सेंद्रीय शेती करून किंवा अजून काही करून शेती फायद्यात आणू शकाल असं वाटतं का? मला महिण्याला 45 हजार पगार मिळतो. तो निव्वळ नफा आहे, कुठल्याही गुंतवणूकीशिवाय. आता मला सांगा, शेतीमध्ये महिण्याला 45 हजार नफा मिळविण्यासाठी किती मुद्दल गुंतवावं लागेल आणि किती रिस्क घ्यावी लागेल? त्यापेक्षा जावूद्या आपल्या पोरांना बाहेर. आणि अन्न मिळालंच पाहिजे असं वाटत असेल तर तसं वाटणाऱ्या लोकांनी इथं येवून शेती करू नये का? शेती म्हंटली की नेहमी शेतकऱ्याच्याच मुलाला शंभर टक्के आरक्षण का? इथंही करा म्हणावं ना स्पर्धा”
सोरटे सर एकामागून एक प्रश्न माझ्या तोंडावर फेकत होते. आणि मी होकारार्थी मान हलविण्याशिवाय फार काही बोलू शकत नव्हतो. I was wondering, was it because I haven't yet become skillful enough at making arguments, and answering back? Or was it because he was right?

1 comment:

  1. गारपीट झाली
    तुम्हाला काय मजा पहायला मिलाली

    गारपीट झाली
    त्याची झोप हवालदिल झाली
    अन् झोपडीही

    आता आता कुठे सुल्तानी ला विरोध करायला शिकला होता
    पण....
    अस्मानी संकटाने अर्धि भाकरी हिसकावुन नेली

    गारपीटग्रस्त भागाचे दौरे अन्
    आचारसंहिता
    आणि बोलतात "तो" उगाच करतो आत्महत्या

    सर्कसितल्या जोकरचीही कोणी एवढी मजा घेत नाही
    आणी असं झाल्यावर "ह्यंना" झोप
    येत नाही?????

    मी विसरलो होतो (भावनिक न होता)
    "तुमची" होली अन् पूरनपोली
    अन् न दिसणारी(?) त्याच्या आयुष्याची
    राखरंगोली

    भाकरी नेली तशी भूक का नाही चोरून
    नेली?
    गारपीट झाली अन् तुम्हाला मजा (लाज वाटली पाहिजे) आली....

    ReplyDelete