Monday, March 23, 2015

Farmers on street – for our lands, for our food!


What will hurt a system most? The system being inefficient? The system being corrupt? The system being broken? System fallen into anarchy? None of these things, I believe! But the system being unconsciousinsensitive to the changes happening in itself; the negative feedback mechanism of the system being inefficient. If this is one thing wrong with the system, no other kind of perfection, or efficiency can save that system.
That was my biggest worry amidst the recent developments in India on the political front, amidst of developments regarding land acquisition act, labor laws, the “Development” talk and the new-born intolerance being fed and forced on to the community which is specifically known for it's unbound tolerance; the worry that if so much comfort have came to our lives that the changes around us are not easily alarming us, that they do not make us feel, “something needs to be done"; the worry that if our “negative feedback mechanism” have simply gone into hibernation. When exactly are we going to feel that “now is the time”?
And this is why, the protest at Delhi by “Kisan Maha Panchayat”, was something that made me personally very happy. Thousands of farmers came on the parliament street on 18th March, resolving to stay put until govt engages them in a dialogue regarding various pending issues in respect agriculture and farmers. For our amusement, It did force the govt to stop bringing the “land acquisition bill” to the floor, which most experts, social activists and farmers believe not to be in favor of farmers, or of the common citizens of this country.
Below is the account of events took place in this protest, during 18th to 21st March, depicting the spirit of India, compiled from the facebook wall of Kavitha Kuruganti. Please visit to FB wall of Kavitha Kuruganti for more details on the issue, media coverage and other details.




Monday, March 16, 2015

मनुष्यबळाचा प्रश्न सोडवताना - सुभाष शर्मांच्या शेतातील धडा

"शॆतमजूरांचा अभाव आणि शॆतमजूरांची कामाबाबतची प्रवृत्ती." माझ्या मागच्या काही महिण्यातील शॆतकऱ्यांसॊबत झालॆल्या चर्चांमध्यॆ शॆतीसमॊरील पहिल्या तीन आव्हानांपैकी एक म्हणून नॊंदविला गॆलॆला मुद्दा. विशॆषतः शॆतकऱ्यांना शाश्वत शॆती पद्धतींचा स्विकार करण्यासाठी प्रॊत्साहीत करताना हा मुद्दा एक मानसिकतॆच्या संदर्भातील आव्हान म्हणून पुढॆ यॆतॊ. उदाहरणार्थ एखाद्या प्रगतीशील शॆतकऱ्याचॆ उदाहरण दॆवून शाश्वत शॆतीपद्धतीनॆसुद्धा शॆती करणॆ कसॆ शक्य आहॆ असॆ सांगण्याचा प्रयत्न करू, तर शॆतकऱ्यांचा पहिला प्रतिसाद साधारण असा यॆतॊ, “त्यांच्याकडॆ मजूर असतील साहॆब, इथं वॆळॆवर माणसंच मिळत नाहीत, आणि मिळाली तरी घरच्यासारखं काम करत नाहीत, तर मग मजूरांच्या जीवावरची शॆती करायची कशी?” यवतमाळचॆ अत्यंत यशस्वी, आणि माझ्या मतॆ शॆतीचा आत्मा जाणून असलॆलॆ सॆंद्रीय शॆतकरी सुभाष शर्मांचॆ उदाहरण या प्रतिक्रियांना अपवाद नाही. विशॆषतः त्यांच्या शॆताबद्दल तर हा तर्क निर्विवादपणॆ लागू पडतॊ. कारण साधारण 8-10 शॆतमजूर सुभाषजींच्या शॆतावर पूर्णवॆळ असतात. त्यामुळॆ तर आपल्याला सहजपणॆ त्यांच्या यशस्वीततॆचा मजुरांच्या उपलब्धतॆशी संबंध जॊडता यॆतॊ. पण असा तॊ संबंध जॊडताना आपण एक गॊष्ट विसरतॊ, ती म्हणजॆ, “हॆ सारॆ मजूर आलॆ कुठून? आणि इथॆ टिकलॆ कसॆ?”

Saturday, March 14, 2015

तज्ञ - अज्ञ भेदभाव, चला दूर करू...


ज्ञाना नाही कोणी वर्ज, जाती-वर्णाचे सोवळे ।
तज्ञ - अज्ञ भेदभाव, चला दूर करू ॥

दि. 13 मार्च 2015

·       तेरा शेतकरी. (दहा महिला, तीन पुरुष.)
·       शिक्षण: बारावी ते अंगठेबहद्दर.
·       विषय: उत्क्रांती व शेती विज्ञान.
·       फळ्यावरील काही टिपण: गुणसूत्रे – 23, जनुके – 38,000.
·       फर्षीवरील काही साहित्य: काही भाताच्या बिया. पेशी, डी.एन.ए., रानकोबी व इतर कोबीचे प्रकार, जेनेटिकली मॉडिफाईड जीव, अशा काहीशा गोष्टींचे रंगीत फोटो. दोन पत्त्यांचे कॅट.

काहीतरी गडबड वाटतेय नाही? पण हो, असेच होते आज पुण्यात झालेल्या गरीब डोंगरी संघटनेच्या बैठकीतील चित्र.

बैठकीला आलेला उत्क्रांती या विषयाचा अभ्यासक धनंजय ताराबाईंना सांगतो की जगातील सर्वात मोठा वैज्ञानिक, आइन्स्टाईन, असा म्हटलेला की जर एखादा विषय तुम्हाला तुमच्या आजीला समजावता आला नाही तर तो विषय तुम्हालाच समजलेला नाही असे मानावे.

Monday, March 9, 2015

Non BT Cotton… A Notable Experience !!






Some farmers from Vidarbha region & Yavatmal district had gone to one day study tour on 15-12-2014. We visited Mr Kishor Thote's farm on that day to know his experience about BT & non BT cotton he grew on his farm.
In his opinion, non BT cotton didn't require any pesticide spray, because bolling of this non BT cotton stared relatively later than BT cotton. And by that time, the season of bollworm was already over. Non BT cotton plants are healthier than its non BT counterparts. (you can see in pictures, non BT cotton has grown up to 4-5 feet in height).

Status of BT & non BT cotton till 15-12-2014

BT Cotton
Non BT Cotton
Source of Seed Local seed retailer Nagpur seed festival
Application of fertilisers
4 times
2 times
Sprays
6 pesticide sprays
1 nutrient spray
Previous crop in the same field
Turmeric with application of cow dung manure
Soybean

From above observations & experience we can't say 100% scientifically that BT cotton is better than non-BT cotton. But above observations certainly show that we are not paying as much attention to non BT cotton as it deserves.

In short, we have to study scientifically on this observation & experience of farmer Mr Kishor Thote & other farmers like him to get the accurate status of these two types of cotton. It will help farmers grow more & more non BT, indigenous cotton to increase the quality of soil, as non BT cotton requires less resources, monitory as well as environmental vis-à-vis BT cotton.

Farmer's name: Kishor Marutirao Thote
Address: At Post Karegaon, Taluka & District Yavatmal
Mob: +91-9423432580

Saturday, March 7, 2015

होळीच्या निमित्तानॆ


मागच्या काही दिवसांपासून एका विषयावर गावकऱ्यांशी बॊलण्याच्या निमित्तानॆ  गावांमध्यॆ गॆल्यावर मला पुन्हा-पुन्हा सतावलॆला एक प्रश्न म्हणजॆ, लॊकांना बॊलतं करायचं कसं? खॆळांच्या माध्यमातून एखादी गॊष्ट खूप चांगल्या पद्धतीनॆ उलगडून सांगता यॆतॆ, पण मुळात खॆळ खॆळण्यासाठी लॊकांना तयार करणं हीच मॊठी परिक्षा! लॊक मॊकळॆ हॊतील कसॆ?
हॆ सारॆ प्रश्न डॊक्यात असताना हॊळीच्या दिवशी एका मित्राच्या निमंत्रणावरून आमगाव (जि. वर्धा) ला गॆलॊ. आणि हॆ काय? लॊक मारॆ चढ्या आवाजात भजनं म्हणताहॆत, पॊरी छान नटून-थटून आल्यात, बायका लहान-लहान मुलींना सॊबत घॆवून फॆर धरून नाचताहॆत, आणि लॊक एकमॆकांना गाण्यांच्या फर्माईशी करताहॆत. यातल्या कशाचंही आपल्याला आश्चर्य किंवा नवल वाटणार नाही. पण या त्या सगळ्या गॊष्टी आहॆत, ज्या आपल्याला रॊजच्या जीवनात करायला भल्या विचित्र वाटतील. सण/नैमित्तीकॆ यासाठीच असतील नाही का? मॊकळं हॊण्यासाठी? आपल्या मर्यादाशीलतॆच्या कल्पना अॊलांडून व्यक्त हॊण्यासाठी? आपल्या सर्वात महत्वाच्या गरजॆला प्रतिसाद दॆण्यासाठी?

ज्वारी पीक विमा (नि)योजना




ज्वारी पीक विमा (नि)योजनाभाग 1

दि. 20 फेब्रुवारी 2015
शेतकरी: दीपक बर्डे
पत्ता: मु. बावापूर, पो. हमदापूर, ता. समुद्रपूर, जि. वर्धा

दीपकभाऊ, हे खर्‍या अर्थाने प्रयोगशील शेतकरी आहेत असे म्हणता यॆईल. आज प्रयोगशीलता म्हटलं की बाजारानुसार नवे पीक घेणे म्हणजे चांगला भाव मिळेल इतकाच त्याचा अर्थ होतो. पण दीपकभाऊ हे या “अर्था”च्या गणीताच्या पलीकडे जाऊन निसर्गात होत चाललेल्या चढ-उतारांना सामोरे जाण्यासाठी शेतीत काय बदल करावे लागतील याच्या शोधात कायम असतात.

दर वेळेस त्यांच्या शेतात गेलं की काही तरी नवीन बघायला व शिकायला मिळणार हे आता नक्की पटलंय. आजही तेच झाले. गेली 2-3 वर्षे शेतकर्‍यांना असा अनुभव येत आहे की जानेवारी-फेब्रुवारी आला की गारपीट तरी होणार नाही तर अवकाळी पाऊस तरी. आता यावर उपाय काय?